भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतलाय. कोहलीने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावलं . त्याचबरोबर संपूर्ण आशिया चषक स्पर्धेतही त्याने आपला जलवा कायम ठेवला. विराटला याच कामगिरीचा फायदा झालाय. या कामगिरीमुळे विराटला टी 20 वर्ल्ड कपआधी मोठी गुडन्यूज मिळालीय.
कोहलीला ICC T20 क्रमवारीत बंपर फायदा झालाय. विराटने 14 स्थानांची झेप घेत 15व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत एकूण 276 धावा केल्या.
हे वाचा : धक्कादायक! मैत्रिणीने आत्महत्या केल्याचं समजताच तिनेही उचलं टोकाचं पाऊल
विराटने त्याच्या T20 करिअरमधील पहिले शतक झळकावलं. कोहलीने हे शतक आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध केलं. यासह विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा क्रिकेटपटू ठरलाय.
भुवनेश्वरला फायदा
कोहलीशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही फायदा झाला आहे. भुवीने आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय अन्य काही सामन्यांमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे भुवीला 4 ठिकाणी फायदा झाला. त्याने सातव्या क्रमांकावर कब्जा केला आहे.












