दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा (Cricket) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे पुनरागमन लांबणीवर पडणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुमरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरीत कसोटींसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार आहे.
बीसीसीआय व भारतीय संघ व्यवस्थापन यांच्या वतीने बुमराच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. या वर्षी दोन महत्त्वाच्या मालिका आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना व एकदिवसीय विश्वकरंडक या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तो तंदुरुस्त असावा यासाठी बुमराला (Cricket) झटपट खेळवण्याचा निर्णय घेण्यात येत नाही आहे.
मात्र तो आगामी आयपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करील याची दाट शक्यता आहे.भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे. याबाबतचे फोटोही त्याने सोशल माध्यमावर प्रसिद्ध केले.
भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसरा कसोटी (Cricket) सामना नवी दिल्ली येथे शुक्रवारपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी अय्यर तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे स्थानिक क्रिकेट स्पर्धेसाठीही त्याची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाप्रमाणे त्यालाही स्थानिक क्रिकेट खेळावे लागणार आहे.