जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशात आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कमरेच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीपर्यंत त्याची दुखापत बरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. त्यानंतर तो आयपीएलपर्यंत ठीक होईल, असे वाटत असताना मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बुमराह आयपीएल 2023 पर्यंत तंदुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघ चिंतेत सापडला आहे. त्याचबरोबर जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंत ही तो तंदुरुस्त होऊ शकणार नाही, अशा बातम्या देखील व्हायरल होत आहे.
हे वाचा : प्रभाससोबतच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान Kriti Sanonनं सांगितलं बॉयफ्रेंडचं नाव??
भारतीय क्रिकेट व्यवस्थापन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे. कारण बुमराह टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माप्रमाणेच त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे.
जसप्रीत बुमरहने आत्तापर्यंत टीम इंडियासाठी ( Mumbai Indians) 30 कसोटी सामन्यांमध्ये 128 विकेट्स, 60 टी-20 सामन्यांमध्ये 70 विकेट्स आणि 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये 120 सामन्यांमध्ये 145 विकेट्स घेतल्या आहेत.