महेंद्रसिंह धोनीसाठी (Cricket) यंदाचा आयपीएल हंगाम अखेरचा असणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक हंगामापासून या चर्चेला उधाणं आलं आहे. वनडे, ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता यंदाचा आयपीएल हंगाम धोनीसाठी अखेरचा असणार असल्याचं बोललं जात आहे. यासर्वावर स्वतः धोनीने अनेकवेळा भाष्य केला आहे. दरम्यान, आता मोठं विधान केलं आहे.
आयपीएल 2023 च्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रोमहर्षक सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाने 226 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात 20 षटके खेळून आरसीबीचा संघ केवळ 218 धावाच करू शकला.
हे वाचा : अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर
दरम्यान एका इवेंटमध्ये धोनीला निवृत्तीविषयी (Cricket) प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर धोनीने मोठं विधान केलं. निवृत्तीला अजून बराच अवधी आहे. सध्या, आम्हाला आयपीएल 2023 मध्ये बरेच सामने खेळायचे आहेत. जर मी आता काही बोललो तर प्रशिक्षक दबावाखाली येऊ शकतात. अशी भीतीही धोनीने यावेळी व्यक्त कली.
धोनीच्या या वक्तव्यावरून सध्या तरी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा विचार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.काल झालेल्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे ५ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
“There’s lot of time to take that call (Retirement). Rightnow we have a lot of games and the coach will be under pressure if I say something.”
– @msdhoni in latest event pic.twitter.com/rR4XWF6NHk
— ` (@icskian) April 17, 2023