भारतीय महिला क्रिकेट (Cricket ) संघ पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्राथमिक साखळीतील अग्रस्थान राखण्यास उत्सुक असेल. थायलंडविरुद्ध गुरुवारी पराभूत झालेल्या पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व राखण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.
भारताने यापूर्वीच्या दोन साखळी सामन्यासाठी एकंदर आठ बदल केले होते. मात्र, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ पूर्ण ताकदिनीशी उतरणार आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कोणताही धोका पत्करणार नाही.थायलंडविरुद्ध पाक ५ बाद ११६ एवढ्याच धावा करू शकले.
नाथकन चांथम हिने ५१ चेंडूंत ६१ धावा करून थायलंडला एक चेंडू आणि चार विकेट राखून विजयी केले. स्पर्धेच्या प्राथमिक गुणतक्त्यात भारत अव्वल, तर पाकिस्तान दुसरे आहेत. गेल्या काही सामन्यात भारताने पाकला सहज पराभूत केले आहे. भारतीय संघ हेच वर्चस्व राखण्याची शक्यता आहे.
भारताने पाकविरुद्धच्या गेल्या पाच टी-२० (Cricket ) लढतींत बाजी मारली आहे. स्मृती मानधनाच्या साथीत शेफाली वर्मा जोरदार सुरुवात करून देईल, अशी भारतास आशा आहे. दोन सामन्यांत सर्वोत्तम ठरलेली जेमिमा रॉड्रिग्ज आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना रोखणे पाकिस्तानला सहज साध्य होणार नाही. भारताचा अचूक मारा पाकिस्तानची डोकेदुखी ठरेल.












