आयपीएलमधील दोन सर्वोत्तम संघ आमनेसामने येत असताना, जल्लोष वेगळ्याच पातळीवर असतो आणि रविवारीही तेच पाहायला मिळाले.चेन्नई आणि मुंबई यांच्यात चुरशीचा सामना झाला, पण शेवटी यलो (CSK ) आर्मीने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 207 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईला रोहित शर्माच्या शतकानंतरही केवळ 186 धावा करता आल्या. चेन्नईच्या या विजयानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड खूप आनंदी दिसला आणि यानंतर त्याने असे काही म्हटले जे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते.
सीएसकेच्या विजयानंतर जेव्हा कर्णधार गायकवाडला विजयाचे कारण विचारण्यात आले, तेव्हा त्याने धोनीचे नाव घेतले. गायकवाड म्हणाला की, आमच्या युवा यष्टीरक्षकाने तीन षटकार मारले आणि त्यामुळे संघाला खूप फायदा झाला. त्यामुळे सामन्यातील विजय आणि पराभवातील फरक स्पष्ट झाला.
हे वाचा : आपण इंटरनेटवर काय पाहिले हे कोणालाही कळणार नाही, अशा प्रकारे डिलीट करा सर्च हिस्ट्री
गायकवाडच्या या विधानामुळे हार्दिक पांड्याला खूप त्रास होणार आहे, कारण धोनीने (CSK ) त्याच्याच चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले होते. धोनी 20 व्या षटकात मैदानात आला आणि पांड्याच्या शेवटच्या 4 चेंडूंवर 500 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या आणि योगायोगाने चेन्नई संघाने 20 धावांनी सामना जिंकला. धोनीने पांड्याच्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारले आणि त्यामुळे सामन्यात मोठा फरक पडला.
ऋतुराज गायकवाडनेही आपल्या गोलंदाजांवर विजयाची धुरा वाहिली. तो म्हणाला की, गोलंदाजांनी नियोजनानुसार अचूक गोलंदाजी केली. त्याने खासकरून आपल्या यॉर्कर्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या मोठ्या हिटर्सना गप्प ठेवणाऱ्या पाथिरानाचे कौतुक केले.
विशेषत: रोहित शर्मा जो पूर्णपणे क्रीजवर सेट झाला होता, पण पाथिरानासमोर काहीही करू शकला नाही. पाथिरानाने 4 षटकात 28 धावा देत 4 बळी घेतले. तुषार देशपांडेनेही 4 षटकात केवळ 29 धावा देत एक बळी घेतला. शार्दुल ठाकूरने 4 षटकात केवळ 35 धावा दिल्या. डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी अप्रतिम होती.