Asia Cup 2022 स्पर्धेच्या 15 व्या अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ विजयी झाला. संघाच्या विजयानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने एक मोठे विधान केले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. तसेच, पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभवदेखील केला होता.
धोनीमुळे पाकिस्तानचा पराभव
आशिया चषक (Asia Cup) 2022 मध्ये नाणेफेकीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर एकही नाणेफेक गमावली नाही. शनाकाच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व सामने जिंकले. युएईच्या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे खूप सोपे असते. आकडेवारीही याची साक्ष देते.
मात्र, फायनलमध्ये नशिबाने श्रीलंकेला साथ दिली नाही आणि शनाकाने नाणेफेक गमावली. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली, पण संघाने हा सामना जिंकला. सामन्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने सांगितले की, IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदामुळे आम्हाला सामना जिंकण्यासाठी मदत झाली.
खुशखबर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय
श्रीलंकेच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य
अंतिम सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने एक खुलाासा केला. त्याने सांगितले की, “2021 मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता. तेव्हा अशा स्थितीत आमचा संघही लक्ष्याचा बचाव करताना विजय मिळवू शकतो, असा विश्वास सर्व खेळाडूंना होता. त्यामुळे संघाला हा सामना जिंकता आला”.
आशिया चषक चा हा अंतिम सामना होता
आशिया कप (Asia Cup) 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी राजपक्षेने 45 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या तर वानिंदू हसरंगाने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. त्याचवेळी 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांच्या खेळात 147 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेसाठी प्रमोद मधुशन (4/34), वानिंदू हसरंगा (3/27) आणि चमिका करुणारत्ने (2/33) हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
दरम्यान, अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक 71 आणि वनिंदू हसरंगाने 36 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 147 धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने 55 आणि इप्तीखार अहमदने 32 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने 4 आणि वनिंदू हसरंगाने 3 बळी घेतले.