वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. या मॅचचा मुंबईकरांना अपेक्षित असलेला निकाल लागला. मुंबई इंडियन्सने मॅच जिंकली. वानखेडेवर धावांचा पाठलाग करणारी टीम बहुतेकदा जिंकते. इथेही तसच घडलं. मुंबई इंडियन्सने RCB वर जरुर दमदार विजय मिळवला. पण यात MI चा कॅप्टन रोहित शर्मा बरोबर चुकीच झालं. आपल्याच शहरात, होम ग्राऊंडवर जे झालं, त्याच दु:ख रोहितच्या चेहऱ्यावर दिसून आलं.
हा सर्व विषय रोहितच्या बाद होण्याशी संबंधित आहे. यावर फॅन्स आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ नाराज आहे. मुंबईच्या इनिंगमध्ये 5 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला आऊट देण्यात आलं.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा बॉलर वानिंदु हसारंगाने त्याला LBW आऊट केलं. हसारंगाने रोहितला बाद केलं नाही, तर त्याचा विकेट बहाल केला, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सर्व वाद इथूनच सुरु झाला.हसरंगाचा चेंडू रोहितच्या पॅडला लागला. बँगलोरच्या टीमने LBW साठी अपील केलं. मैदानातील अंपायर्सनी अपील मान्य केलं नाही. त्यानंतर RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसीने DRS घेतला. इथे निर्णय बदलला. मैदानी अंपायरचा नॉट आऊटचा डिसिजन बदलण्यात आला. रोहितला बाद ठरवण्यात आलं.
हे वाचा : चित्रपटाचा रामदास स्वामींशी खास संबंध.. अभिनेत्याचा Video व्हायरल
रोहितला या निर्णयाने दु:ख झालं. कारण चेंडू पॅडला लागला, त्यावेळी तो क्रीजच्या आत नाही, तर बाहेर होता. पण कदाचित TV अंपायरने रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पसला लागतोय, एवढच पाहिलं असावं. त्यानंतर त्यांनी रोहितला बाद दिलं.IPL चा नियम काय सांगतो?. LBW च्या 3 मीटर रुलनुसार, बॅट्समनच्या पायाला चेंडू जेव्हा लागतो, त्यावेळी स्टम्पसपासून 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब उभा असेल, तर तो OUT नसतो. रोहितच्या प्रकरणातही जवळपास हे सर्व असच होतं.
असं झाल्यास, त्यावरुन वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने थेट डीआरएस सिस्टिमवर निशाणा साधलाय. DRS हे थोडं जास्त झालं नाही का? LBW कसा असू शकतो?
निर्णयावर प्रश्नचिन्ह पण रोहित खूश
जो निर्णय झाला, तो आता बदलता येणार नाही. पण यापुढे असू घडू नये, यासाठी काळजी घ्यावी लागेल. मुंबई इंडियन्ससाठी चांगली बाब म्हणजे या महत्वाच्या सामन्यात त्यांनी RCB वर विजय मिळवला. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा निश्चित या बद्दल आनंदी असेल. रोहितने या मॅचमध्ये फक्त 7 धावा केल्या.
Hello DRS, yeh thoda jyada nahi ho gaya? How can this be lbw? pic.twitter.com/bAgFNevUXL
— Mohammad Kaif (@MohammadKaif) May 9, 2023












