T20 वर्ल्ड आता सेमीफायनलपासून काही अंतरावर येऊन ठेपला आहे. टी20 वर्ल्डमधील प्रत्येक मॅच थरारक आणि जबरदस्त होतंय. त्यात गुरुवारी शादाब खानच्या बॅलिंगपुढे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडाला.पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव झाला.
गट-2 मधील सर्व संघांचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे सेमीफायनलची मॅच कोणामध्ये रंगणार यावर तर्क लावले जातं आहे. आतापर्यंत झालेल्या मॅच आणि गुणतालिका पाहता सेमीफायनलमध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर T20 पाकिस्तान चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवानंतर चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे 4 सामन्यांतून 5 गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चार सामन्यांत 3 विजयांसह 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाचा शेवटचा सामना रविवारी नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास सेमीफायनलचं तिकीटवर आपली मोहर लागणार आहे.जर टीम इंडिया ग्रुप-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीतील दुसरा संघ बनण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
यामुळे त्याचे 6 गुण होतील. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्यास त्याचे केवळ पाच गुण होतील आणि पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, अशी प्रार्थनाही पाकिस्तानला करावी लागेल. भारत आणि पाकिस्तान T20 गट-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना गट-1 मधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांशी होईल. उपांत्य फेरीत आपला सामना जिंकल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांशी खेळताना दिसणार.
असे झाले तर चाहत्यांसाठी तो चमत्कारापेक्षा कमी नसेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.त्यामुळे फायनलमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांशी दोन हात करावे अशी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण दोन्ही गटातील सामने पूर्ण झाल्यानंतर अखेर फायनलमध्ये नक्की कोणामध्ये रंगेल हे कळेल आणि त्यानंतरच फायनलचं तिकीट पक्कं होईल.