Saturday, June 21, 2025

Cricket मैदानात उतरताच रचणार इतिहास! किंग विराट कोहली विक्रमापासून फक्त एक पाऊल दूर!

इंदौरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा कसोटी (Cricket) सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

अशात तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ यावर्षीची ही बॉर्डर- गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर करू शकतो. याशिवाय, या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खास विक्रमाला गवसणी घालणार आहे.विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.त्याने ५८.२२ च्या स्ट्राईक रेटने एकूण १० हजार ८२९ धावा केल्या आहेत. ज्यात ३४ शतक आणि ५१ अर्धशतक झळकावली आहेत.

दरम्यान, २५४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.  विराटने आतापर्यंत मायदेशात १९९ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व (Cricket) केले आहे. आस्ट्रेलियाविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली मायदेशातील २००वा आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

हे वाचा : Jio चा एक रिचार्ज आणि Netflix आणि Amazon Prime सोबतच, पाहा काय खास ऑफर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, या सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघाला कमबॅक करण्याची एकुलती एक संधी असेल.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ-

ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी (डब्ल्यूके), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म