रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ वनडे वर्ल्ड कप ( World Cup) २०२३ च्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांत वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे. पण ही फायनल आता कधी आणि कुठे खेळवण्यात येणार आहे, याची माहिती समोर आली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पराभूत झाल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण भारताने वर्ल्ड कपमध्ये सर्व सामने जिंकले होते आणि त्यांना फायनलमध्येच पराभव पत्करावा लागला होता. पण आता भारताला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी चालून आली आहे.
पण यावेळी भारत या पराभवाचा बदला घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात U19 World Cup Final होणार असल्याचे समोर आले आहे. पण हा अंतिम फेरीचा सामना नेमका कधी आणि कुठे होणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे होणार आहे. बेनोनी येथे या वर्ल्ड कपमधील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे आता याच मैदानात वर्ल्ड कपचा अंतिम फेरीचा थरारही रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया ( World Cup) यांच्यातील अंतिम फेरीचा सामना हा रविवारी ११ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी चाहत्यांना वर्ल्ड कप फायनलचा थरारत अनुभवायला मिळणार आहे.