Friday, April 18, 2025

IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का

इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 9 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने 12 धावांनी विजय मिळवत पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2024 Points Table) आपलं स्थान कायम राखलं आहे. तर सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्याने दिल्ली डेअरडेव्हलचा संघ तळाच्या संघांमध्ये घसरला आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठीही फारसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत नाहीये. मुंबईचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दिल्लीच्या संघाच्याही खालच्या क्रमांकावर आहे.

पहिल्या स्थानी कोणता संघ? राजस्थान रॉयल्सचा हा यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024 Points Table) दुसरा विजय ठरला आहे. या विजयासहीत राजस्थान 4 पॉइण्ट्ससहीत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. राजस्थान रॉयल्सचा नेट रन रेट +0.800 इतकं आहे. केवळ चेन्नईचा संघ राजस्थानहून वरचढ ठरला आहे.

चेन्नईच्या संघाचेही 4 पॉइण्ट्स आहेत मात्र त्यांचा नेट रन रेट अधिक सरस असल्याने ते अव्वल स्थानी आहेत. +1.979 रन रेटसहीत चेन्नईचा संघ 9 सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. चेन्नईच्या संघाने त्यांच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये गतविजेत्या राहिलेल्या गुजरातच्या संघाबरोबरच मुंबईच्या संघाला पराभूत केलं आहे.

2 पॉइण्ट्स असलेले 5 संघ : राजस्थान आणि चेन्नई वगळता स्पर्धेतील पहिल्या 9 सामन्यांनंतर प्रत्येकी एक सामना जिंकून 2 पॉइण्ट्स मिळवणारे 5 संघ आहेत. यामध्ये 2 सामन्यांमध्ये एक विजय आणि एका पराभवसहीत सनरायझर्स हैदराबाद पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2024 Points Table) तिसऱ्या स्थानी आहे. कोलकात्याचा संघ एक सामना खेळाला असून तो सामना त्यांनी जिंकला.

कोलकाता चौथ्या स्थानी असून एक पराभव आणि एका विजयासहीत पंजाबचा संघ पाचव्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही एक विजय आणि एका पराभवासहीत 6 व्या स्थानी आहे. गुजरातच्या संघाने मुंबईला पराभूत केलं असून ते सुद्धा एक विजय आणि एका पराभावसहीत सातव्या स्थानी आहेत.

भोपळाही न फोडता आलेले 3 संघ : आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयश हाती लागलेले दिल्ली आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला पॉइण्ट्सच्या बाबतीत भोपळाही फोडता आलेला नाही. दिल्ली पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या तर मुंबई नवव्या स्थानी आहे. केवळ एक सामना खेळू त्यातही पराभावचं तोंड पहावं लागलेला लखनऊ सुपर जायट्सचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2024 Points Table) तळाशी आहे.

IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का

आज कोणता सामना?

आज म्हणजेच 29 मार्च रोजी कोलकाता आणि आरसीबीचा सामना होणार आहे. कोलकात्याने मोठ्या फरकाने हा सामना जिंकला तर ते थेट पहिल्या स्थानीही जाऊ शकतात. दुसरीकडे आपला तिसरा सामना खेळणाऱ्या आरसीबीकडेही अशीच संधी उपलब्ध आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म