Tuesday, June 24, 2025

players : धोनी की कोहली, ओपनिंग पार्टनर कोणाला निवडशील? एलिस पेरीच्या उत्तराने जिंकले मन

महिला प्रीमियर लीग सुरू असून यात भारतासह परदेशातील महिला खेळाडूंच्या (players) कामगिरीची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर एलिस पेरी आरसीबीच्या संघात आहे.आरसीबीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ती दिसते.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. या दोन्ही खेळाडूंबाबत एलिस पेरीला एक प्रश्न विचारण्यात आला होता.यावर पेरीने तिच्याच अंदाजात उत्तरही दिलं. चाहत्यांकडूनही तिच्या उत्तराचं कौतुक केलं जात आहे.

हे वाचा : पेट्रोल-डिझेलने दिला मोठा धक्का, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

एलिस पेरीला विचारण्यात आलं होतं की, ओपनिंग पार्टरन म्हणून धोनी किंवा कोहली (players) यांच्यापैकी कोणाची निवड करशील? या प्रश्नाला उत्तर देताना पेरीने म्हटलं की, मी या दोन्ही खेळाडूंना ओपनिंगसाठी सोबतच निवडेन.ज्यामुळे मी बाहेर बसून दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहू शकेन आणि या क्षणाचा आनंद घेऊ शकेन.

एलिस पेरीला आरसीबीने 1.20 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. तिने दोन सामन्यात मिळून 44 धावा काढल्या आहेत. यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 31 धावांची खेळी केलीय. 169 च्या स्ट्राइक रेटने तिने पहिल्या दोन सामन्यात धावा केल्या. अद्याप आरसीबीला एकही विजय मिळवता आलेला नाही.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म