क्रिटेटप्रेमींसाठी आणि भारतीयांसाठी आताची सर्वात मोठी बातमी…T20 World Cup मध्ये भारत फायनल धडकणार असल्याची दाट शक्यता आहे. याबद्दलं मोठं कारण समोर आलं आहे. टीम इंडिया T20 World Cup 2022 ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी काही अंतर दूर आहे.
टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे. क्रिकेट समिक्षकांच्या मते भारत हा इंग्लंडवर विजय मिळवतं फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
T20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 22 सामने झाले आहेत, त्यापैकी 12 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर 10 सामने इंग्लंड संघाने जिंकले आहेत.
तर T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत तर इंग्लिश संघाने 1 सामना जिंकला आहे. 2012 साली भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना खेळला गेला होता.
2012 मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडचा 90 धावांनी पराभव केला होता. या शानदार सामन्यात इंग्लिश संघाचा पराभव करण्यात टीम इंडिया यशस्वी ठरल्यास अंतिम फेरीत प्रवेश निश्चित होईल. टीम इंडिया आता ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता यावेळी टी-20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी त्याच्यापासून फार काळ दूर राहणार नाही.
असं झाल्यास भारत 15 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकेल. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक जिंकला होता. 2007 साली भारत आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकातील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाने 18 धावांनी विजय मिळवला. हा तोच सामना आहे, ज्यात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.