जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Xmail) आता ईमेल जगात पाऊल ठेवणार! एलन मस्क यांच्या Xmail मुळे Gmail ला कडवी टक्कर मिळणार? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच नवीन कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ChatGPT सारख्या त्यांच्या उत्पादन xAI सादर केले. आता ते ईमेलच्या जगातही पाऊल ठेवण्याची योजना आखत आहेत. लवकरच ते Xmail नावाची नवीन ईमेल सेवा सुरु करणार आहेत, ज्यामुळे गुगलच्या जीमेलसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
Gmail ला करावा लागणार अडचणींचा सामना
अलीकडेच जीमेल बंद झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. अशावेळी मस्क यांच्या Xmail च्या घोषणेमुळे जीमेलला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. Xmail ट्विटरशी जोडला जाण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या सुरक्षा अभियांत्रिकी संघातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने Xmail साठी विचारणा केली होती, ज्याला उत्तर देताना मस्क यांनी या नवीन ईमेल सेवेची माहिती दिली.
सोशल मीडियावर चर्चा:
मस्क यांच्या Xmail च्या घोषणेने सोशल मीडियावर चर्चेला तोंड फोडले आहे. काही वापरकर्त्यांनी जीमेलवरील विश्वास उडाल्याचे म्हटले आहे, तर काही हॉटमेल सारख्या इतर ईमेल सेवांचा वापर करणार असल्याचे म्हटले आहे. Gmail ही जगातील सर्वात मोठी ईमेल सेवा आहे, ज्याचे 2024 पर्यंत जगभरात 1.8 अब्ज वापरकर्ते असतील. Xmail च्या आगमनाने ईमेल सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Gmail बंद होणार नाही:
मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी XAI मध्ये XML तयार होईल असे मानले जात आहे. दुसरीकडे, जीमेल बंद झाल्याच्या अफवांवर Google ने ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे की ते कुठेही जात नाही आणि Gmail सेवा सुरूच राहणार आहे.
मस्कची संपत्ती आणि गुंतवणूक:
ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती 214 अब्ज डॉलर आहे. गेल्या 24 तासांत त्यांनी 8.39 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. तरीही, यावर्षी त्यांची एकूण संपत्ती घसरली आहे. याउलट, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत यंदा वाढ झाली आहे. परिणामी, 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत एलन मस्क अंबानी आणि अदानी यांच्या मागे आहेत.
एलन मस्क यांच्या इतर कंपन्या:
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क हे टेस्ला व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत. टेस्लामध्ये 20.5%, स्टारलिंकमध्ये 54%, SpaceX मध्ये 42%, X (पूर्वीचे ट्विटर) मध्ये 74%, बोरिंगमध्ये 90%, XAI मध्ये 25% आणि न्यूरालिंकमध्ये 50% हिस्सेदारी आहे. या कंपन्यांच्या शेअर्समधील वाढ आणि घसरणीनुसार त्यांची निव्वळ संपत्ती वाढ आणि कमी होतं.
हे वाचा : उद्या माघ पौर्णिमा! तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या