आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वांकडेच अँड्रॉइड फोन आहेत. स्मार्टफोन हाती असल्यामुळे स्वाभाविकच व्हॉट्स अॅप, फेसबुक ट्विटर यांसारखी समाजमाध्यमेही मोठ्या प्रमाणावर हाताळली जात आहेत. सोशल मीडियाचा हा वाढता वापर एकीकडे माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतोय खरा, पण सध्या फेसबुक युजर्ससाठी धोक्याची घंटा वाजली आहे. डाटा लीक (Data leak) होण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे फेसबुक युजर्सनी संभाव्य धोका रोखण्यासाठी तातडीने आपले पासवर्ड बदलण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
10 लाख युजर्सचा डाटा लीक
डाटा लीकच्या वाढत्या प्रमाणाने फेसबुक युजर्सच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल दहा लाखांहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा लीक (Data leak) झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
लीक झालेला डाटामध्ये फेसबुक अकाउंटच्या पासवर्डचाही समावेश आहे. नजीकच्या काळात हा धोका आणखी वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सनी आपले पासवर्ड लगेच बदलावेत, असे आवाहन सोशल मीडियातील जाणकारांनी केले आहे.
थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून डाटा लीक
फेसबुकवरील डाटा चोरीचा प्रकाराबाबत मीठ आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून डाटा लीक (Data leak) झाल्याचे मेटाने म्हटले आहे. मेटाने आतापर्यंत 400 हून अधिक ॲप्सची ओळख पटवली आहे.
मेटाचे वरिष्ठ अधिकारी डेविड एग्रानोविच यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. अॅप्पल आणि अँड्रॉइड फोनसाठी बनवलेल्या विशिष्ट अॅप्सच्या माध्यमातून डाटा चोरीचे धाडस दाखवले जात आहे.संबंधित ॲप्स अॅप्पल आणि गुगल अॅप स्टोअरवर सहजासहजी उपलब्ध होत आहेत.
मार्क झुकेरबर्ग यांना बसलाय 5 अब्ज डॉलर्सचा फटका
डाटा चोरीचा प्रकारांमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना आतापर्यंत पाच अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. 2018 मध्ये कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डाटा लीक (Data leak) झाला होता. त्या प्रकरणात फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकला पाच अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला होता.