Airtel ने नोव्हेंबर २०२२ मध्ये आपल्या अनेक प्लानला बंद केले होते. ज्यात Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन (subscription ) फ्री ऑफर केले जात होते. कंपनीकडे फक्त दोन प्लान होते. ज्यात ओटीटी मेंबरशीप फ्री मिळत होती. परंतु, आता देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या एअरटेलने आपल्या दोन प्रीपेड प्लानला रिलाँच केले आहे. एअरटेलकडे ३९९ रुपये आणि ८३९ रुपये किंमतीचे दोन प्रीपेड प्लान आहे. ज्यात हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.
३९९ रुपयाचा प्लान
३९९ रुपयाचा एअरटेल प्लान कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे सब्सक्रिप्शन (subscription ) फ्री मिळते. म्हणजेच ग्राहकांना ३ महिन्यांपर्यंत हॉटस्टारचे मोबाइलचा फ्री फायदा मिळणार आहे. ३९९ रुपयाच्या एअरटेल प्लानमध्ये ग्राहकांना २.५ जीबी डेटा रोज मिळतो.
हे वाचा : 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम जाणून घ्या?
या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगही मिळते. या पॅकमध्ये ग्राहक २८ दिवस पर्यंत १०० एसएमएस रोज वापरू शकता. याशिवाय, Airtel Thanks बेनिफिट जसे विंक म्यूझिक, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक मिळू शकते.
८३९ रुपयाचा प्लान
एअरटेलच्या ८३९ रुपयाच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar Mobile चे सब्सक्रिप्शन (subscription ) फ्री मिळते. या प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. म्हणजेच एकूण १६८ जीबी डेटाचा फायदा या प्लानमध्ये मिळू शकतो. ग्राहकांना डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ३ महिन्यासाठी फ्री मिळते.
याशिवाय, या प्लानमध्ये RewardsMini सब्सक्रिप्शन, Apollo 24|7 Circle, फ्री हॅलोट्यून्स आणि Wynk Music ची मेंबरशीप फ्री मिळते. या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलची सुविधा मिळते. म्हणजेच एअरटेलकडे एकूण चार प्लान आहेत. ज्यात Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री ऑफर केले जाते. या प्लानची किंमत ३३५९ रुपये, ८३९ रुपये, ४९९ रुपये आणि ३९९ रुपये आहे.