Saturday, June 21, 2025

Internet : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?

येत्या काळात तंत्रज्ञानाचा फायदा होण्यापेक्षा यच तंत्रज्ञानामुळं (Internet ) घात होण्याची चिन्हं आहेत. कारण ठरणार आहे ते म्हणजे रशियाचा अतिरेक. रशिया अंतराळात अण्वस्र तैनात करणार असल्याची गुप्त आणि तितकीच धक्कादायक माहिती अहवालात उघड झाली आहे.

जपान आणि अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये याविरोधात प्रस्ताव सादर केला. रशियाच्या या अँटीसॅटेलाईट अण्वस्त्रांमुळे जगासमोर मोठं संकट निर्माण  होण्याची शक्यता आहे. रशिया अंतराळाक स्थापित कपरु पाहणाऱ्या या अण्वस्त्रांचा स्फोट झाल्यास ऊर्जेची प्रचंड लाट निर्माण होईल. ज्यामुळे उपग्रह नष्ट होतील. याचा फटका सर्वच व्यावसायिक आणि सरकारी उपग्रहांवर होईल. थोडक्यात मोबाईल फोन, इंटरनेट (Internet ) सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा : आज लोकसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद

ही सर्व परिस्थिती पाहता सर्वच देशांनी अंतराळातील अण्वस्त्रांना विरोध करायला हवा असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे. दरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. रशिया अशा प्रकारचं कोणतंही शस्त्र तयार करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तेव्हा आता त्यांचा हा दावा नेमका किती खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म