तुम्हाला OTT मोफत सबस्क्रिप्शन आणि दीर्घ वैधता , भरपूर डेटा हवे असल्यास (BSNL Recharge) चे दोन नवीन प्लान एकदम खास आहेत. वास्तविक, भारत संचार निगम लिमिटेड ने दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत.या दोन्ही प्लॅनमध्ये समान अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत, फक्त फरक वैधतेमध्ये आहे. चला तर मग या दोन प्लानबद्दल सर्व काही तपशीलवार जाणून घेऊ या..
269 प्रीपेड प्लान
BSNL Recharge च्या 269 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लानमध्ये 2GB दैनिक डेटा मिळतो. या प्लानची एकूण वैधता 30 दिवसांची आहे आणि यात अमर्यादित व्हॉइस कॉलआणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये BSNL ट्यून्स देखील आहे जे कोणत्याही मर्यादेशिवाय गाणी रूपांतरित करून देते. या प्लानमध्ये चॅलेंज एरिना गेम्स, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट , लिस्टन पॉडकास्ट सर्व्हिसेस आणि झिंग यासह आणखी फायदे आहेत.
हे वाचा : T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर संतापला जसप्रीत बुमराह, पाहा काय म्हणाला.
769 प्रीपेड प्लान
बीएसएनएलचा 769 रुपयांचा प्लानही 269 रुपयांच्या प्लानसारखाच आहे. 769 रुपयांच्या या प्लानमध्ये एकूण 90 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS मिळतात. प्लानमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे वर नमूद केलेल्या 269 रुपयांच्या प्लानसारखेच आहेत.
सरकारी दूरसंचार कंपनीने हे दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. दोन्ही प्लान आता रिचार्ज (BSNL Recharge) करण्यासाठी उपलब्ध आहेत. ज्यांना 30 दिवस किंवा 90 दिवसांची वैधता पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे दोन प्लान चांगले आहेत. किमान 30 दिवस आणि एक मासिक वैधता प्लान मिळावा यासाठी ट्रायने पावले उचलल्यानंतर सर्व खाजगी दूरसंचार कंपन्यांनी तसेच बीएसएनएलने अशा वैधतेसह प्रीपेड प्लान सुरू केले आहेत.