मेटाने (WhatsApp ) एक प्रेस रिलीज पाठवून माहिती दिली आहे की बुधवारपासूनच सर्व वापरकर्त्यांना हे नवीन फीचर मिळण्यास सुरुवात होईल. अवतार फीचर फेसबुक मेसेंजर आणि त्याच्या न्यूज फीडसाठी 2019 मध्येच जारी करण्यात आले होते. यानंतर ते अॅपच्या स्टोरीज आणि कमेंट्स विभागात वाढवण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामसाठीही अवतार सादर करण्यात आला होता.
WABetaInfo नुसार, हे फीचर केवळ iOS आणि Android च्या बीटा वापरकर्त्यांसाठी या वर्षी ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आले होते. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने तुमचा अवतार हे तुमचे डिजिटल व्हर्जन असल्याचे म्हटले आहे. करोडो कॉम्बिनेशन्समधून ते तयार होऊ शकते. यासाठी, वापरकर्ते वेगवेगळ्या केशरचना, चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये आणि पोशाख एकत्र करू शकतात.
यासाठी तुम्ही वेगवेगळे स्किन टोन, हेअरस्टाइल आणि डोळे-नाक सेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला Done वर टॅप करावे लागेल. हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केले गेले आहे. परंतु, सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी लागू शकते.