UIDAI ने लोकांना आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. एवढेच नाही तर भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यांची जागा बदलावी लागली तर ते त्यांचा पत्ता आधारमध्ये अपडेट करून घेऊ शकतात. तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही देखील करु शकता.
अनेकदा लोकांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक किंवा पत्त्यासह अनेक चुका होतात. कधी-कधी नावही चुकते. ते कसं बदलावं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुम्ही याची प्रोसेस अवश्य जाणून घ्यायला हवी.
आधार कार्डमधील (Aadhar Card) नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारखे सर्व पर्सनल डिटेल अपडेट करण्यासाठी, आधार कार्डवर तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड करणे आवश्यक आहे. जेणेकरून अपडेट दरम्यान त्याच नंबरवर OTP पाठवता येईल. पुढे पाहूया आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस…
सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा. यानंतर कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
आता तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला OTP टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा. यानंतर, खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला ऑनलाइन आधार सेवा दिसेल. येथे दिलेल्या यादीमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील. आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ती सिलेक्ट करा.
आता तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला OTP टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा. यानंतर, खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला ऑनलाइन आधार सेवा (Aadhar Card) दिसेल. येथे दिलेल्या यादीमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील. आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ती सिलेक्ट करा.