एचएमडी ग्लोबलनं या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातील नोकिया (Nokia ) G60 5G आणि X30 5G सह नोकिया C31 जागतिक बाजारपेठेत लाँच केला होता. आता फिनिश कंपनीने खिशाला परवडेल अशा Nokia C31 स्मार्टफोनची घोषणा चीनमध्ये केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
पण या स्मार्टफोनमधील फीचर्स पाहून तुम्हीही खूश व्हाल. या स्मार्टफोनमध्ये 5050mAH ची बॅटरी, 13 एमपीचा कॅमेरा आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात दोन मेमरी कॉन्फिगरेश दिले आहेत. 4 GB RAM+ 64 GB स्टोरेज आणि 4 GB RAM+128 GB स्टोरेज असे दोन पर्याय आहेत. बेस मॉडेलची किंमत 9700 रुपये इतकी असून हाय व्हेरियंटची किंमत 9.970 रुपये आहे.
हे वाचा : प्रॅक्टिस मॅचमध्ये राहुलनं केला हा कारनामा..
बजेट स्मार्टफोन अॅडव्हान्स ग्रे, नॉर्डिक ब्लू आणि मिंट ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Nokia C31 मध्ये 6.74 इंचाचा एलडी डिस्प्ले असून रिजॉल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन असून 5MP सेल्फी शूटर आहे.
नोकिया (Nokia ) C31 IP52 लेव्हल वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन, 4G ड्युअल सिम/ड्युअल स्टँडबाय, ब्लूटूथ 4.2 आणि वाय-फाय 4 ला सपोर्ट करतो. हे 3.5mm हेडफोन जॅकसह येते आणि मायक्रो-USB इंटरफेसवर चार्ज होते. हा स्मार्टफोनमध्ये UNISOC SC9863A1 प्रोसेसर आहे. त्याचबरोबर मेमरी 512 GB पर्यंत वाढवू शकतो.