आपण दिवाळीनिमित्ताने आपल्यासाठी गरजेची वस्तू खरेदी करतो. आजकाल मोबाईलला (Smartphone) खूप मागणी वाढलेली आहे. स्वस्तात मोबाईल मिळत असेल तर कोणीही खरेदी करण्याचा विचार करतो. सध्या Flipkart वर बिग दिवाळी सेल सुरु आहे.
दिवाळीच्या एक दिवस आधी 23 ऑक्टोबरपर्यंत हा सेल चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर हा सेल तुमच्यासाठी कामाचा आहे.
सर्वात महागडे फोन सेलमध्ये अतिशय स्वस्तात मिळत आहेत. जवळपास 15 हजार रुपयांचा Nokia G21 (Smartphone) फक्त 549 रुपयांना खरेदी करता येईल. Nokia G21 ची लॉन्चिंग किंमत 14,499 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होत आहे
हे वाचा : राज ठाकरे यांचं आता मुंबईकरांना पत्र, म्हणाले, शिंदे आणि फडणवीस.
Nokia G21 एक्सचेंज ऑफर
Nokia G21 वर 13,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळेल. परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच 13,450 रुपये सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत 549 रुपये असेल.
काय आहे Nokia G21 बँक ऑफर
तुम्हाला जुना (Smartphone) फोन एक्सचेंज करायचा नसला तरी तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. फोनवर बँक ऑफर देखील आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 12,749 रुपये होईल.