तरुणाईच्या गळ्यातलं ताईत असलेल्या फोटो – व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram ) आता लवकरच रिपोर्ट ऑप्शन मिळणार आहे. हे फीचर ट्विटरच्या रिट्विट फीचर प्रमाणे काम करेल.म्हणजे समजा एखाद्या युजरने ट्विटरवर ट्विट केलं की बाकीचे युजर्स हे ट्विट रिट्विट करतात. जेणेकरुन ती रिट्विट केलेली पोस्ट त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर दिसते.
फेसबुकवर सुद्धा तुम्हाला एखाद्या युजरची पोस्ट शेअर करता येते. ही शेअर केलेली पोस्ट तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसते. आता असंच काहीसं फीचर इंस्टाग्रामवर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.टेक क्रंच या टेक्नॉलॉजी वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, सध्या इंस्टाग्राम आपलं हे रिपोस्ट फीचर टेस्ट करत आहे.
इंस्टाग्रामच्या प्रवक्त्याने असं म्हटलंय की, इंस्टाग्रामवर (Instagram ) एखादी पोस्ट रिपोस्ट कशी करता येईल यावर सध्या काम सुरू आहे. त्याचप्रमाणे युजर्सना दुसऱ्यांची स्टोरी सुद्धा शेअर करता यावी यासाठीही काम सुरू आहे. पण रिपोस्ट करताना किंवा रीशेअर करताना ओरिजनल क्रियेटर्सना त्याचा क्रेडिट मिळावं अशी सुविधा इंस्टाग्राम देण्याच्या विचारात आहे.
या प्रायव्हसी फीचर मध्ये हि केले बदल…
मेटा कंपनीच्या अखत्यारीत येणाऱ्या इंस्टाग्रामने सध्या आपल्या प्रायव्हसी फीचर मध्ये नवीन बदल केले आहेत. या बदलांप्रमाणे एखाद्या सोळा वर्षाच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना इंस्टाग्रामवरील (Instagram ) संवेदनशील कंटेंट बघता येणार नाही. इंस्टाग्रामने याची ऑफिशियल घोषणाही केलेली आहे. म्हणजे एखादा सेन्सिटिव्ह कंटेंट असेल तर त्यासाठी अंडरएज युजर्सना तो कंटेट बघता येणार नाही. यासाठी पेरेंट कंट्रोल ऑप्शनची मदत घेतली जाईल असेही इंस्टाग्रामने स्पष्ट केलंय.












