नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने गुरुवारी One97 Communications Ltd ला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून UPI सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली. NPCI नुसार, ॲक्सिस बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक यासह चार बँका OCL साठी PSP (पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर) बँका म्हणून काम करतील (Online Payment).
पेटीएमला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन म्हणून काम करण्यासाठी मान्यता मिळणे कंपनीसाठी एक मोठा दिलासा आहे. हे पाऊल सकारात्मक असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पेटीएमच्या थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर परवान्याची मंजुरी म्हणजे ग्राहक पेटीएम ॲपद्वारे UPI पेमेंट करु शकतात. पेटीएमवर दुसरे बँक खाते (पेटीएम बँक वगळता) लिंक करून लोक UPI पेमेंट सुरू ठेवू शकतात.
थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर हे असे प्लॅटफॉर्म आहेत जे NPCI ची UPI पेमेंट सेवा देतात. PhonePe पासून Google Pay पर्यंत, सर्व थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर आहेत.पेटीएमवर अडचणीत आली होती. आरबीआयने पेटीएम पेमेंटवर बँकेवर बंदी घातली होती. आरबीआयने 29 फेब्रुवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँक (Online Payment) नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, असे म्हटले होते.
एवढेच नाही तर 15 मार्चनंतर लोक पेटीएम पेमेंट बँकेत नवीन फंड जोडू शकणार नाहीत. याचा थेट परिणाम पेटीएमच्या सामान्य पेमेंट ॲपवर होईल. आता पेटीएम ही सुविधा PPBL ऐवजी नवीन भागीदार बँकांमार्फत पुरवेल.
NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) साठी TPAP (थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर) परवाना देते. ज्या कंपन्या आणि संस्थांना UPI-आधारित पेमेंट सेवा देऊ इच्छितात त्यांना हा परवाना दिला जातो. UPI सुविधा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणजेच TPAP द्वारे दिली जाते. यासाठी एनपीसीआयची परवानगी आवश्यक आहे.
पेटीएम ग्राहकांसाठी (Online Payment) आणखी एक मोठा बदल होणार आहे. ज्या लोकांच्या पेटीएम यूपीआय आयडीच्या शेवटी @Paytm लिहिले आहे, ते आता @YesBank मध्ये बदलेल. यामुळे, पेटीएमचे ग्राहक आणि व्यापारी पूर्वीप्रमाणेच UPI व्यवहार सुरू ठेवू शकतील. त्याच वेळी, त्यांच्या UPI खात्यावर ऑटो पेमेंट सेवा देखील सुरू राहील.