Sunday, June 22, 2025

बजेटमध्ये मिळतील हे सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टचे Smartphones! झटपट चार्जिंग फूल

स्मार्टफोन (Smartphones) हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या काळात लोक आपल्या छोट्या-छोट्या कामांसाठी मोबाईलचा वापर करतात. यासोबतच आपल्या गरजेनुसार फोनचं सिलेक्शन करतात.

जेणेकरुन त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. अशा वेळी आपल्या फोनची बॅटरी जास्त काळ चालावी आणि लवकर चार्ज व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यावर्षी असे अनेक मिड-रेंज स्मार्टफोन्स मार्केटमध्ये आले आहेत. ज्यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आज आपण अशाच मिड रेंज स्मार्टफोन्सविषयी जाणून घेणार आहोत. जे तुम्ही काही मिनिटांमध्ये चार्ज करु शकता.

1. iQOO Neo 7 Pro 5G

या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC चिपसेट आहे. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. हे Android 13 वर काम करते. यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 120W फ्लॅशचार्जला सपोर्ट करते. या फोनबद्दल (Smartphones) सांगितले जात आहे की हा 27 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो. तुम्ही Amazon वरून 32,999 रुपयांना खरेदी करू शकता.

2. Redmi Note 12 Pro+ 5G

हा फोन 6.67-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह येतो. हे Android 12 वर बेस्ड आहे आणि त्यात MediaTek Dimensity 1080 चिपसेट आहे. ज्यामुळे त्याचा परफॉर्मेंस जबरदस्त आहे. हा फोन12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. यात 200MP अल्ट्रा कॅमेरा + 8MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा + 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. एक 16MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आलाय. यात 4,980mAh बॅटरी आहे, जी 120W Xiaomi हायपर चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. तुम्ही Amazon वरून 27,999 रुपयांना खरेदी करू शकता.

हे वाचा : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?

3. iQOO Neo 7 5G

हा फोन Android 13 वर काम करतो आणि त्यात MediaTek Dimensity 8200 चिपसेट आहे. त्याच्या 12GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यात 64MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 120W फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीला (Smartphones) सपोर्ट करते. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी 27 मिनिटे लागतील.

4. Xiaomi 11i Hypercharge 5G

या Xiaomi स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी 120W Xiaomi हायपर चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. या फोनबद्दल असे म्हटले जाते की, हा 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. हा फोन Android 11 वर काम करतो. यात 6.67 इंच 120Hz FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 108MP मेन कॅमेरा, 8MP वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. तसेच, यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म