Saturday, June 21, 2025

Whatsapp व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार पुन्हा नवा अपडेट; नक्की काय? त्यासाठी बातमी वाचा

Meta च्या मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून आज (28 नोव्हेंबर) नव्या फीचरची घोषणा करण्यात आली आहे. ‘Message Yourself’ हे नवं फीचर लवकरच भारतामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

काही आठवड्यात हे फीचर उपलब्ध होईल. या फीचर द्वारा 1:1 चॅट करता येणार आहे. तुम्ही स्वतःलाच नोट्स, रिमाईंडर, आणि अपडेट्स पाठवू शकाल. कंपनीकडून जारी स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वर युजर्स नोट्स, रिमांईडर्स, शॉपिंग लिस्ट आणी बर्‍याच गोष्टी स्वतःला पाठवू शकतात. नवं फीचर वापरण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ओपन करा, नवं चॅट बनवा. टॉप वर असलेल्या कॉन्टॅक्ट्स वर क्लिक करा. स्वतःला निवडा आणि मेसेज करायला सुरूवात करा.

हे वाचा : जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीला पुन्हा जाग; सर्वत्र आगीचे लोट

हे फीचर अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस मध्ये चालणार आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात तुम्हांला ही फीचर्स वापरता येणार आहे.महिन्याच्या सुरूवातीला, मेटा फाऊंडर आणि सीईओ Mark Zuckerberg यांनी ‘Communities on WhatsApp’ जारी केले आहे. तत्पूर्वी एका व्हिडीओ कॉल मध्ये 32 व्यक्तींचा समावेश, इन चॅट पोल्स यांचा समावेश केला आहे.

Meta CEO च्या माहितीनुसार, आमच्याकडून Communities लॉन्च करण्यात आल्या आहेत. ज्यात मल्टिपल थ्रेड्स, सब ग्रुप्स, चॅनल्स अनाऊसमेंट करता येतील. लवकरच 32 लोकांचा व्हिडिओ कॉल आणि पोल्सचे पर्याय देखील उपलब्ध होतील. हे सारे end to end encryption ने सिक्युअर केलेले आहे. त्यामुळे तुमचा मेसेज देखील प्रायव्हेट राहतो.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म