Monday, December 15, 2025

Feature :व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, जे वापरकर्त्यांला ठरेल उपयुक्त

व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन फीचर्स (Feature) येत असतात. मात्र फार कमी लोकांना या नवीन फीचर्सबद्दल माहिती नसते आहे. आज आम्ही तुम्हाला इतरांचे स्टेटस आणि मेसेज गुप्तपणे कसे पाहता येणार आहेत, याची माहिती देणार आहोत.

नवीन फिचर्स

Read Receipt बंद केल्याने, लोकांना तुमच्या वाचलेल्या संदेशांची माहिती मिळणार नाही. म्हणजेच जर तुम्ही वापरकर्त्याने पाठवलेला मेसेज वाचला तर साधारणपणे व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लू टिक येते. हे फीचर (Feature) बंद केल्यानंतर ब्लू टिक येणार नाही.
यामुळे, तुम्ही त्याचे मेसेज वाचले आहेत की नाही हे कोणालाही कळणार नाही.तसेच, या फीचरमुळे तुम्ही इतरांचे स्टेटसही गुपचूप पाहू शकता.म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखाद्या वापरकर्त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहता तेव्हा तुमचे नाव त्याच्या सीन लिस्टमध्ये दिसणार नाही.

ते कसे काय?

सर्व प्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा.सेटिंगमध्ये जा आणि Privacy च्या पर्यायावर जाऊन क्लिक करा. आता Read Receipt चे फीचर दिसेल, ज्याच्या समोर एक टिक बॉक्स असेल. तुम्हाला यावर ऑफ बटण दाबावे लागेल. यानंतर तुम्ही वरील सर्व फीचर्स (Feature) वापरू शकाल.

फीचर्सचे तोटे

या फीचरचे काही तोटे देखील आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर लास्ट सीड फीचरसारखेच आहे. म्हणजेच, जो हे फीचर बंद करेल त्याला ब्लू टिक दिसणार नाही. दुसरी व्यक्ती तुमचे मेसेज वाचत आहे की नाही याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार नाही.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म