gmail जगभरात जीमेलची सेवा ठप्प, नेटकऱ्यांनी ट्विटरवर मांडली तक्रार..

दिग्गज टेक कंपनी गुगलची ईमेल (gmail) सेवा जीमेल ठप्प झाली आहे. अनेक यूजर्सला जीमेलवरून मेल पाठवताना अडचण येत आहे. जीमेलचे अ‍ॅप आणि डेस्कटॉप व्हर्जन दोन्हीही वापरताना लाखो यूजर्सला समस्या येत आहे. अनेक यूजर्सने मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर जीमेल डाउन झाल्याची माहिती दिली आहे.

अनेक यूजर्सला जीमेल लॉग इन करताना अडचण येत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, जवळपास १ तासापासून यूजर्सला जीमेल वापरताना समस्या येत आहे. यूजर्सला जीमेल (gmail) अ‍ॅप आणि डेस्कटॉप व्हर्जन दोन्हीवरून मेल पाठवता येत नाहीये. जगभरातील जीमेलच्या लाखो यूजर्सला याचा फटका बसला आहे. जीमेल डाउन झाल्यानंतर गुगलकडून देखील यावर प्रतिक्रिया आली आहे.

हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 11-12-22

‘जीमेल (gmail) सेवा वापरताना यूजर्सला अडचण येत असून, लवकरच ही समस्या सोडवली जाईल’, असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.सॉफ्टवेअर अपडेटमुळे ही समस्या आल्याचे सध्या सांगितले जात आहे. जीमेलची सेवा ठप्प झाल्यानंतर अनेक यूजर्सने ट्विटरवर तक्रार केली आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #GmailDown ट्रेंड होत आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म