इचलकरंजी पार्वती औद्योगिक वसाहतीच्या पिछाडीस बंद असलेल्या यंत्रमाग औद्योगिक (industrial) संस्थेतून १ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ५८ इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी संस्थेच्या चेअरमन सौ. किर्तीमालिनी वसंतराव नाईक (वय ४७ रा. सहकारनगर) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पार्वती औद्योगिक (industrial) वसाहतीच्या पिछाडीस जयवर्धन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था असून सौ. किर्तीमालिनी नाईक या चेअरमन आहेत. मागील दीड महिन्यापासून ही संस्था बंदच आहे. हीच संधी साधत चोरट्यांनी संस्थेच्या मागील असलेला लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केला.
हे वाचा Lifestyle पायावर आलेली सूज तात्काळ होईल गायब, ‘हे’ उपाय देखील तुम्हाला दिलासा; जाणून घ्या
तेथे असलेल्या ४८ यंत्रमागाच्या ४८ मोटारी, कांडी मशिनवरील ४ मोटारी व १ कॉम्प्रेसरवरील मोटार चार स्पेअर मोटर व इमरीवरील मोटर व यंत्रमागाचे खराब स्पेअर पार्टस् (Spare parts) असा १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २४ एप्रिल ते ९ मे २०२२ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.