दिल्लीत तरुणीला (Crime) कारखाली १२ किमी फरफटत नेल्याची घटना ताजी असताना बंगळुरूतही अशीच घटना समोर आली आहे. येथे एका स्कूटीचालकाने ७१ वर्षीय वृद्धाला एक किमीपर्यंत फरफटत नेले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बेंगळुरूमध्ये एका वृद्ध व्यक्तीला स्कूटरवरून सुमारे एक किमीपर्यंत फरफटत नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या घटनेनंतरआरोपी फरार आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीला भरधाव वेगात असलेल्या स्कूटीच्या मागे फरफटत नेताना दिसत आहे. पीडिताचे नाव ७१ वर्षीय मुथप्पा असे असून ते प्रकाशक म्हणून काम करतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा संताप उफाळून आला असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
साहिल असे स्कूटरस्वाराचे नाव आहे. साहिलने मुथप्पाच्या एसयूव्हीला मागून धडक दिली. यामुळे संतापलेल्या मुथप्पा गाडीतून खाली उतरून त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता तो पळू लागला. मुथप्पा यांनी जेव्हा त्याची स्कूटर पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात ते अडकले. दरम्यान, साहिल न थांबता त्यांना ओढत वेगाने पळू लागला. मुथप्पा जवळपास एक किलोमीटर (Crime) फरफटत गेला.
या घटनेत मुथप्पा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, तो खूप घमेंडखोर होता. माझ्या बोलेरोला पाठीमागून धक्का दिल्यानंतर तो न थांबता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मला त्याला पळून जाऊ द्यायचे नव्हते. मी त्याची स्कूटर घट्ट पकडली पण तो पुढे जाऊ लागला.
काही लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही. अखेर दोन ऑटोचालक आणि बाईकस्वार त्याला रोखण्यात यशस्वी झाले.मुथप्पा यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित लोकांनी अॅम्ब्युलन्स बोलावून मला उपचारासाठी पाठवले.
घटनास्थळी अनेक लोक जमा झाले होते आणि या लोकांनी स्कूटरस्वाराला चांगला मारही (Crime) दिला.माझ्या गाडीला धक्का दिल्यानंतर केवळ त्याने सॉरी म्हटले असते तर मी त्याला जाऊ दिले असते. जेव्हा मी चालत्या स्कूटरमध्ये अडकलो तेव्हा माझ्या शूज आणि कपड्यांमुळे मला दुखापत कमी झाली. माझ्या शरीराच्या खालच्या भागात अनेक जखमा झाल्या आहेत.
#WATCH | Man being dragged behind a scooter on Bengaluru’s Magadi road
The victim is currently under medical treatment a city hospital. The two-wheeler driver has been apprehended by the police at PS Govindaraj Nagar: DCP West Bengaluru
(Video verified by Police) pic.twitter.com/nntPxaZxSu
— ANI (@ANI) January 17, 2023