‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Crush). गेल्या अनेक दिवसांपासून, अभिनेत्री तिच्या हिंदी पदार्पणाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.आता तीनं तिच्या व्यग्र कामातून फ्री होताच मालदीव गाढलं आहे.
रश्मिकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॅकेशनचा फोटो शेअर केला आहे. मात्र तिच्या या फोटोमुळे भलतीच चर्चा रंगल्याचं दिसत आहे. 2 दिवसांपूर्वी, रश्मिका आणि विजय देवरकोंडा मुंबई विमानतळावर मॅचिंग आउटफिट्समध्ये स्पॉट झाले होते.
त्यामुळे दोघेही सोबत मालदीवला रवाना झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता रश्मिकानं (Crush) शेअर केलेल्या फोटोवरुन दोघेही एकत्र असल्याच्या चर्चा आणखीनच रंगल्या आहेत. रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं विजयचे सनग्लासेस घातले असल्याचं म्हटलं जातंय.
विजय देवरकोंडा भारतातून निघाला तेव्हा तो त्याच गॉगलमध्ये दिसला होता ज्यामध्ये रश्मिकानं आत्ता फोटो शेअर केला आहे.त्यामुळे विजय आणि रश्मिका यांनी स्वतंत्रपणे भारत सोडला असला तरीही मालदीवमध्ये एकत्र असल्याचे पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे. मात्र, रश्मिका आणि विजयने अद्याप त्यांचा एकत्र फोटो शेअर केलेला नाही.
दरम्यान, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी पहिल्यांदा ‘गीता गोविंदम’ चित्रपटात दिसली होती. यानंतर दोघांची जोडी ‘डिअर कॉम्रेड’मध्येही दिसली होती. या दोन्ही चित्रपटांत चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्य असल्याच्या चर्चा आहे. मात्र दोघांनी यावर फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं म्हटलंय.