Saturday, April 19, 2025

Social Media विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, ‘जरा भेटायला ये’

परीक्षेत  चांगले गुण मिळावेत यासाठी विद्यार्थी  वर्षभर कठोर मेहनत घेतात. काही विद्यार्थी तर रात्रंदिवस अभ्यास करतात, पण काही विद्यार्थी असे असतात जे वर्षभरही अभ्यास करत नाहीत. मग परीक्षेत प्रश्नांची उत्तरं सूचली नाहीत की उत्तरपत्रिकेत वाटेल ते लिहितात. सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका उत्तरपत्रिकेने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे.

सोशल मीडियावर उत्तरपत्रिका व्हायरल

एका शाळेत विद्यार्थ्यांना परिक्षेत लग्न  म्हणजे काय? या विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आलं होतं. यावर एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 10 गुणांचा हा प्रश्न होता. पण शिक्षकाने या निबंधाला शुन्य गुण दिले आहेत. शिवाय Nonsens जरा भेटायला ये असा शेराही उत्तरपत्रिकेवर  लिहिला. विद्यार्थ्याने लिहिलेल्या निबंधाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्न म्हणजे काय? वाचा विद्यार्थ्याचं उत्तर

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारी ही उत्तरपत्रिका एका इंग्रजी शाळेतील असून सोशल स्टडी या विषयाची आहे. लग्न म्हणजे काय असा प्रश्न या परिक्षेत विचारण्यात आला होता, त्यावर विद्यार्थ्याने जे उत्तर लिहिलंय. मुलीचं लग्न तेव्हा केलं जातं, जेव्हा तिला तिच्या घरते सांगतात, आता तू मोठी झाली आहेस, आता आम्ही तुला खायला घालू शकत नाही. त्यामुळे तू आता एका चांगल्या पुरुषाचा शोध हे जो तुझं पोट भरू शकेल.

हे वाचा युवकाच्या हत्येचे कारण ठरलं मोबाईल अन् गावात आरोपींची घरेच जाळली

मग ती मुलगी एका मुलाला भेटते, ज्याचे आईवडिलही लग्नासाठी त्याच्या मागे लागलेले असतात. आता तू मोठा झाला आहेस लवकर लग्न कर असं त्याला बजावत असतात. मग तो मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटतात, दोघं एकमेकांची परीक्षा घेतात आणि एकमेकांना पसंत करतात. त्यानंतर दोघं आनंदाने एकत्र राहतात’

ट्विटरवर @srpdaa नावाच्या एका युजरने या उत्तरपत्रिकेचा फोटो पोस्ट (Social Media) केला आहे. या फोटोवर जवळपास तीन हजार लाईक आणि 3 हजार रिट्विट आहेत. अनेक युजर्सने यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने या निबंधाला 10 पैकी 10 गुण दिले आहेत. तर काही जणांनी कोणता पुरस्कार बाकी असेल तर या विद्यार्थ्याला द्या असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच हिंदी विषयाची एक उत्तपत्रिका व्हायरल झाली होती. आठव्या इयत्तेच्या हिंदी विषयाचा हा पेपर होता. पेपरमध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते. यातला एक प्रश्न होता कबीरदास यांच्यावर निबंध लिहा. तर दुसरा प्रश्न होता अमिताभ बच्चन  यांच्यावर लेख लिहा. यावर विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षकांनीही आपल्या डोक्यावर हात मारून घेतला असेल.

कबीरदार यांच्यावर निबंध लिहा, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना विद्यार्थ्याने पेपरवर कबीरदास असं लिहिलंय आणि त्यावर निबंध लिहिलं. तसंच अमिताभ बच्चन यांच्यावरही कथा असं लिहून आपलं उत्तर पूर्ण केलं आहे. 100 मार्कांच्या या पेपरसाठी शिक्षकाने या विद्यार्थ्याला शुन्य मार्क दिले.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म