जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सिंहाची गणना होते. वन्य प्राणीही त्यांचा सामना करण्याची हिंमत करत नाहीत, मग माणसं काय आहेत? सिंहाची शक्ती इतकी असते की ते हत्तीसारख्या महाकाय प्राण्यांचीही शिकार करू शकतात. याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतात, ज्यामध्ये सिंह किंवा सिंहिणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात.
तुम्हीही जंगल सफारीदरम्यान किंवा प्राणीसंग्रहालयात सिंह पाहिले असतील. मात्र सध्या प्राणीसंग्रहालयातील एका असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.या व्हिडिओमध्ये असं दिसतं, की काही तरुण सिंहिणींच्या जवळ अडकले आहेत आणि सिंहिण त्यांच्यापैकी एकावर हल्ला करतात. कोणी त्याचा पाय धरला तर कोणी त्याला पंजाने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, तिथे असलेली इतर मुलं पळून जातात, तर काही या दृश्याचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात.
हे वाचा : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! अभिनेत्याच्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा
व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) तुम्ही बघू शकता की, सिंहिणी त्या तरुणावर कशाप्रकारे हल्ला करतात. परंतु हा तरुण धैर्य दाखवतो आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी त्याचं काय होतं, हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. हे प्राणीसंग्रहालयातील दृश्य असल्याचं सांगितलं जात आहे. हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर जीसान अन्सारी नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘प्राणीसंग्रहालयाला फिरायला गेले होते’.
हा व्हिडिओ आतापर्यंत 45 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. शेकडो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, कोणीच मदत करत नाहीये, सगळे व्हिडिओ (Viral Video) बनवण्यात व्यस्त आहेत. आणखी एका यूजरने लिहिलं, हे अतिशय धक्कादायक आहे, आपण सिंहांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. तर काही यूजर्सचं म्हणणं आहे, की ते फक्त खेळत आहेत
या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : – Watch Video