शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम (Viral Video) आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं.
असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एक तानलेला पाणघोडा नदीजवळ येत होता. पण या नदीच्या काठावर मगरी झोपल्या आहेत. इतक्या मगरींमधून वाट काढणं काही सोपं काम नाही. थोडीशी जरी चूक झाली तरी सगळ्या मगरी एकाच वेळी अंगावर धावून येतील. अन् पाणघोड्याचा मृत्यू निश्चित आहे. अशा वेळी त्या पाणगोड्यानं काय केलं हे आता तुम्हीच पाहा.
मगर ही सगळ्यात धोकादायक (Viral Video) प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात.
Everyone recognizes a psycho when they see one pic.twitter.com/AO3XxHtAcA
— Insane Reality Leaks (@InsaneRealitys) February 21, 2024
दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पानगेंडा चक्क मगरींच्या कळपात जात आहे. मगरींनी जरा जरी पाठ फिरवली तर पानगेंड्याचा मृत्यू निश्चित झालाच. मात्र गेंडा रिस्क घेतो आणि मगरींमधूनच वाट काढत पाण्यात उडी मारतो.
गेंड्यानं रिस्क घेतली मात्र तो किती घाबरला होता हे सुद्धा व्हिडीओतून (Viral Video) पाहायला मिळत आहे.पानगेंड्याचा आणि मगरीचा हा व्हिडीओ @InsaneRealitysनावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.