Monday, June 23, 2025

weapons Demonstration नाशिकमध्ये भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन, पाहा काय आहे खास

नाशिक शहरात प्रथमच देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त युनायटेड वि स्टँड फाउंडेशन आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे 18 आणि 19 मार्च असे दोन दिवस भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन (weapons Demonstration) भरवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन सैन्य दलातील शस्त्र पाहावीत त्यांचा अभ्यास करावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शस्त्र जवळून बघण्याची संधी

या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांना अनुभवता येणार आहे. केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले आहे. इतर नागरिकांना लष्कराचे कार्य कसे चालते हे माहीत नसते. यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची शस्त्र नागरिकांना जवळून पाहायला मिळणार आहेत.

काय पाहायला मिळणार?

या प्रदर्शनात (weapons Demonstration) विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकिय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे आहेत. यासोबतच रायफल्स, रॉकेट लांउचर्स, इंडियन फिल्ड गन, बोफोर्स, धनुष, 105 एमएम गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार असल्याची माहिती युनायटेड वि स्टँड फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले यांनी दिली आहे.

संवाद साधण्याची संधी

या प्रदर्शनात तरूणांना सैनिकांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. अग्नीवीर भरती मार्गदर्शनही या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म