Actress : सोनाली कुलकर्णी अंबाबाई मंदिरासमोर गोंधळात सामील

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress)  ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोनाली ही एक उत्तम अभिनेत्रीसोबत एक उत्तम गायिका देखील आहे. सोनाली ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली मंदिरासमोर गोंधळ घालताना दिसत आहे.

सध्या सोनाली ही महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमातून सगळ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन दिली आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या निमित्तानं खरं तर सोनालीनं अमरावतीला भेट दिली.

या व्हिडीओतून सोनालीनं (Actress) अमरावतीमधील प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन केल्यानंतर मंदिरासमोर गोंधळही घातला होता.  या व्हिडीओच्या माध्यमातून सोनालीनं अमरावतीची खाद्यसंस्कृती आणि तिथल्या वेगवेगळ्या जागांची माहिती दिली आहे.

हा गोंधळाचा व्हिडीओ शेअर करत सोनालीनं कॅप्शन दिलं की अंबा देवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना… पाहा #MaharashtraOnMyLips चा संपूर्ण भाग आता, असे कॅप्शन दिले आहे. सोनालीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

फक्त हा एक नाही तर सोनालीनं या आधी देखील आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ शेअर करत तिच्या या नवीन कामाविषयी सांगितले होते. सोनाली ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीचे लाखो चाहते आहेत.

सोनालीनं ‘तमाशा लाइव्ह, ‘झिम्मा’, ‘व्हिक्टोरिया’, ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. सोनालीनं खूप कमी वेळात चित्रपटसृष्टीत तिचं नाव कमावलं होतं. सोनालीला सुरुवातील उत्तम नृत्यांगना अशी ओळख मिळाली होती.

सोनाली कुलकर्णीने (Actress) कोरोना काळात कुणाल बेनोडेकरबरोबर सप्तपदी घेतल्या होत्या. कोरोना संपल्यानंतर त्या दोघांनी अगदी थाटामाटात पुन्हा एकदा लग्न केलं. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोनाली शेअर करताना दिसते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म