फोन हरवल्यास Google Pay, Paytm आणि Phone Pe चे अकाऊंट कसे ब्लॉक कराल ? जाणून घ्या

सध्याच्या काळामध्ये डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ली प्रत्येकजण कॅश जवळ बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटच करताना दिसून येतो. प्रत्येकजण हल्ली upi चा वापर करतो. आपल्या फोनमध्ये यासाठी गुगल पे , फोन पे , पेटीअम आणि अन्य apps असतात ज्यामधून आपण ऑनलाइन व्यवहार करतो. ऑनलाइन व्यवहार करत असताना आपल्याला यूपीआय पिन टाकावा लागतो. मात्र कधी आपला हा स्मार्टफोन हरवला तर आपले मोठे नुकसान होऊ शकते.

Upi सपोर्ट करणरे Apps हे वापरकर्त्यांना त्यांच्या बँक अकाऊंटमधून थेट डिजिटल पेमेंट करू देतात. जर का तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्रायव्हसी सेटिंग ऑन केले नसले आणि तुमचं फोन हरवला किंवा फोन चुकीच्या हातांमध्ये गेला तर तुमचे अकाऊंट पूर्णपणे रिकामे होण्याची शक्यता असते.

तुमचा फोन हरवला असेल आणि तो सापडत नाही तोपर्यंत तुम्ही या Apps न तात्पुरते किंवा कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुमच्याशिवाय इतर कोणताही व्यक्ती तुमच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुमचं फोन हरवला असल्यास PhonePe, Google Pay आणि Paytm ही apps तुम्ही ब्लॉक करणे फायद्याचे ठरू शकते. हे App कसे ब्लॉक (block) करायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर का तुम्ही गुगल पे वापरत असाल तर कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधण्यासाठी १८००४१९०१५७ तुम्ही हा नंबर डायल करू शकता. इथे संपर्क केल्यावर तेथील एक प्रतिनिधि तुमचे अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. जर का तुम्ही तुम्ही Android डिव्हाइस वापरत असाल तर, त्यामुळे फोनवरून Google Pay अ‍ॅप आणि तुमचे Google अकाऊंटमध्ये कोणालाही अॅक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमचा डेटा डिलीट करू शकता.

त्याशिवाय तुम्ही फोन पे चे वापरकर्ते असाल तर ०८०६८७२७३४ आणि ०२२६८७२७३४ या नंबरवर फोन करणे आवश्यक आहे. तेथील प्रतिनिधी तुम्हाला तुमचे अकाऊंट ब्लॉक कसे करायचे यासाठी मदत करतील.

तुमचा फोन हरवला असेल आणि तुम्ही पेटीअम App वापरत असाल तर अकाऊंट बंद करण्यासाठी तुम्ही पेटीअम पेमेंट्स बँक हेल्पलाईनवर 01204456456 या नंबरवर कॉल करू शकता.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्या App च्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.

२. या नंतर तुम्हाला lost phone हा पर्याय निवडावा लागेल.

३. यानंतर Enter a different number हा पर्याय सिलेक्ट करावा.

४. वरील प्रोसेस झाल्यावर डिव्हाइसमधील सर्व अॅप्समध्ये लॉग आऊट हा पर्याय निवडा.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म